पुणे शहरातील वाहतुकीत बदल

Ganpati bappa kasaba

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आजपासून पुणे शहराच्या मध्यवस्तीतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. शिवाजी रस्ता आणि अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक या दरम्यानचा रस्ता सायंकाळी पाच वाजल्यापासून रात्री गर्दी संपेपर्यंत बंद राहणार आहे. विसर्जनाच्या दिवसापर्यंत हा बदल कायम राहणार आहे.

असे असतील वाहतुकीतील बदल

लक्ष्मी रस्त्याकडून बेलबाग चौकातून शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी असणार आहे. पाचव्या, सातव्या आणि नवव्या दिवशी विसर्जनस्थळी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे

शिवाजीनगरवरून चारचाकी वाहनांना जूना बाजार-मालधक्का मार्गे नेहरू रस्त्याने सेव्हन लव्हज हॉटेल चौक येथून स्वारगेटकडे जाता येईल.

अप्पा बळवंत चौकातून बुधावर चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी बाजीराव रस्त्याने शनिवारवाड्या वळसा घेऊन जिजामाता चौकातून फडके हौद चौक मार्गे जावे.

लक्ष्मी रस्त्यावरून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी हमजेखान चौकातून डावीकडे वळून महाराणाप्रताप रस्त्याने जावे.

पार्किंगची ठिकाणे

विमलाबाई गरवारे कॉलेज, कर्वे रस्ता
पुलाचीवाडी, नदीपात्र
दारुवाला पूल ते खडीचे मैदान, सोमवार पेठ
काँग्रेस भवन ते मनपा भवन
व्होल्गा चौक (लक्ष्मीनारायण थिएटर) ते मित्र मंडळ चौक
कुंभारवेस ते गाडगीळ पुतळा
टिळक पूल ते भिडे पूल (नदीपात्र)

पहा नकाशा वाहतुकीतील बदलाचा