मुसळधार पावसामुळे मुंबईची पुन्हा झाली तुंबई

टीम महाराष्ट्र देशा : मंगळवारच्या सायंकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत पुन्हा पाणी तुंबले आहे. त्यामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

काळ रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे टिळक नगगर, अंधेरी पूर्वेकडील मरोळ, सातबाग, परळमधील हिंदमाता, सायन, सायन रेल्वे ट्रॅकवर पावसाचं पाणी साचलं आहे. गुघड्याभर साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. चक्रीवादळाच्या स्थितीमुळे मुंबई आणि परिसरात पुढील दोन कोसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कुलाबा परिसरात १७१ मिमी पाऊस तर सांताक्रूझ परिसरात ५८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.