‘एनडीए’ला तडा, भाजपने गमावला आणखी एक मित्रपक्ष

amit_shah

नवी दिल्ली : बिहारमध्ये भाजपाप्रणित एनडीएला मोठा धक्का बसला आहे. सरकारमधून बाहेर पडलेले राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांनी काँग्रेसप्रणित यूपीएचा ‘हात’ धरला आहे. त्यामुळे बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक मित्र मिळाला आहे.

महाआघाडीत प्रवेश केल्यानंतर कुशवाहा यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. एनडीएमध्ये माझा अपमान केला जात होता. तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माझा नीच असा उल्लेख करत मला अपमानित केले, असा आरोप कुशवाहा यांनी यावेळी केला.Loading…
Loading...