fbpx

एक आदमी को जेल..एक आदमी को बेल..ये है नरेंद्र मोदी का खेल..

lalu prasad yadav and narendra modi

आरजेडी प्रमुख तथा बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याच्या चौथ्या प्रकरणातही न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आले. सहापैकी चार खटल्यात लालूंवरील दोष सिद्ध झाले आहेत. या प्रकरणातील दुसरे आरोपी माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांना मात्र निर्दोष सोडण्यात आलं आहे. या दोघांसह चारा घोटाळ्यात ३१ आरोपी होते.
दरम्यान आरजेडी नेते रघुवंशप्रसाद सिंह यांनी शाब्दिक कोटी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाना साधला आहे. ते म्हणाले जब है नरेंद्र मोदी और नितीश का मेल, अजब है खेल, दुबारा से हो गया जगन्नाथ मिश्रा रिहा, और लालू यादव को जेल. एक आदमी को जेल, एक आदमी को बेल, यही है नरेंद्र मोदी का खेल,

लालूप्रसाद यादव यांच्यावर चारा घोटाळ्याचे एकूण सहा खटले आहेत, ज्यापैकी तीन प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर आज दुमका कोषागार या चौथ्या प्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आले. लालूप्रसाद यांच्यावर डिसेंबर १९९५ ते जानेवारी १९९६ दरम्यान दुमका कोषागारमधून १३.१३ कोटी रुपये बोगस पद्धतीने काढल्याचा आरोप आहे. न्यायालयाने १९ जणांना दोषी ठरवलं असून, १२ जणांची सुटका केली आहे. लालूंच्या शिक्षेवर २१,२२ आणि २३ मार्चला सुनावणी होणार आहे. आरजेडी नेते रघुवंश प्रसाद सिंह म्हणाले, हा सर्व नरेंद्र मोदी आणि नितीश कुमारांचा खेळ आहे. पुन्हा एकदा लालू यादवांना जेलमध्ये जावे लागले आणि जगन्नाथ मिश्रा यांची सुटका झाली आहे.