हीच का तुमची नैतिकता? मुंबईच्या राणीचा प्रशासनाला खडा सवाल.

मुंबई तुझा बी.एम.सीवर भरोसा नाही काय? अशी वादग्रस्त साद घालणाऱ्या आरजे मलिष्काने मुबईतील परळ-एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणाविषयी संताप व्यक्त केला आहे. ‘या दुर्घटनेनंतर आधी पूल तुटल्याचं आणि शॉक सर्किटचं कारण देण्यात आलं. त्यानंतर पावसामुळे ही दुर्घटना घडल्याचं म्हटलं गेलं. हीच का तुमची नैतिकता?’, असा प्रश्न मलिष्काने तिच्या ट्विटमधून उपस्थित केला आहे. मलिष्काच्या या ट्विटला काही जणांनी रिट्विट केलं आहे.या बरोबर चित्रपट सुष्टीतील अनेक कलाकारांनी या बाबत निषेध   व्यक्त केला आहे.Loading…
Loading...