रिया चक्रवर्तीच्या ‘त्या’ फोटोने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

रिया चक्रवर्तीच्या ‘त्या’ फोटोने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

riya

मुंबई : रिया चक्रवर्ती हे नाव चांगलेच परिचित आहे. विशेषत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर मोठयाप्रमाणात चर्चेत आली. नुकतंच रियाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधलं जात आहे.

सोशल मीडिया स्टोरीवर रियाने दोन फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटो तिच्या हातात हनुमान चालीसा दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत ती सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात हनुमान चालीसाचे वाचन करताना दिसत आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी रियाने आर्यन खानच्या अटकेनंतर एक प्रेरणादायी पोस्ट शेअर केली होती. ‘तुम्ही ज्या गोष्टींमधून ,परिस्थितीमधून जात आहात त्यामधून शिकून पुढे मार्गक्रमण करत राहा.’असे तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती.

दरम्यान सुशांत सिंह राजपूतसंबंधित ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीचे नावही समोर आले होते. याप्रकरणी १ महिन्यासाठी तिला तुरुंगवासाची शिक्षाही भोगावी लागली होती. मात्र आता तिच्या दिनचर्या विषयी जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक असतात. त्यामुळे तिने शेअर केलेल्या फोटोला बरेच कमेंटस् ही येत आहे. तशी रिया ही सतत सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.

महत्वाच्या बातम्या