हुतात्मा संग्राम पाटील यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत – ऋतुराज पाटील

sangram patil

कोल्हापूर : सीमेपलीकडून पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत असून काल झालेल्या गोळीबाराला चोख प्रत्यूत्तर देताना कोल्हापूर जिल्ह्यातील जवान संग्राम शिवाजी पाटील यांनी हौतात्म्य पत्करलं.

जम्मू काश्मीरमधील राजोरी भागात नोशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केला. तिथे  १६ मराठा बटालियन तैनात होती. या बटालियनच्या जवानांनी पाकीस्तानी इरादे हाणून पाडले. मात्र या संघर्षात निगवे खालसा येथील संग्राम पाटील यांना वीरमरण आलं.

गावचा सुपुत्र देशाच्या रक्षणात हुतात्मा झाल्याची बातमी समजताच निगवे खालसा गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे. गावाचे व्यवहार 3 दिवसांकरता बंद ठेवण्यात आले आहेत.दरम्यान, ही बातमी कळताच आमदार ऋतुराज पाटील यांनी निगवे खालसा या गावाला भेट तसेच संग्राम पाटील यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या