Share

Andheri By Election | अंधेरी पोटनिवडणूक ऋतुजा लटके एकतर्फी जिंकतील ; राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची प्रतिक्रिया

मुंबई : ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरुन चांगलंच राजकारण तापलं होतं. महापालिकेमध्ये कार्यरत असणाऱ्या लटके यांनी अंधेरी पोटनिवडणुकीसाठी राजीनामा दिला होता. हा राजीनामा महापालिका मंजूर करत नसल्याने हे प्रकरण हायकोर्टात गेलं होतं. या प्रकरणी ऋतुजा लटके यांना दिलासा मिळाला असून त्यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. अशात राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, खासदार सुनिल तटकरे यांनी या निवडणुकीवर भाष्य केलंय.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित आहे. कारण काँग्रेससह राष्ट्रवादीचा लटके यांना पाठिंबा आहे.  त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं सुनिल तटकरे म्हणालेत. महाविकास आघाडीचा पाठिंबा पाहता ऋतुजा लटके ही निवडणूक एकतर्फी जिंकतील, असा विश्वासही तटकरे यांनी व्यक्त केला. ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत जे झालं ते शोभणीय नाही. त्यांना निवडणुकीपासून रोखणं हे असंस्कृतपणाचं लक्षण असल्याचं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

न्यायलयाने फटकारल्यानंतर राजिनामा मंजूर करायला सांगणं हे सरकारी यंत्रणेला अशोभनीय आहे, असंही तटकरे म्हणालेत. 2019 ला मुरजी पटेल यांना अपक्ष निवडणुक लढवली होती. त्यावेळी अपक्ष निवडणुक लढवताना त्यांना कुणाचा पाठिंबा होता हे आता उघड झालं असल्याचा खुलासा त्यांनी यावेळी केला. शिंदे आणि ठाकरे गटात जे राजकारण सुरु आहे ते महाराष्ट्रासाठी घातक आहे. महाराष्ट्राच्या संस्कृत परंपरेला शोभणारं हे राजकारण नाहीत, असंही ते यावेळी बोलताना म्हणालेत.

ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने मंजूर केला असून ऋतुजा लटके यांनी राजीनामा मंजूर झाल्याचं पत्र स्वीकारलं आहे. यानंतर आता ऋतुजा लटके महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांसोबत निवडणुक उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ऋतुजा लटके यांनी मतदारांना आवाहन करत रेकॉर्डब्रेक विजय खेचून आणायचा आहे, असं म्हटलं आहे. तुम्हा सगळ्यांचा पाठिंबा हवा आहे, महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही, असंही त्यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरुन चांगलंच राजकारण तापलं होतं. महापालिकेमध्ये कार्यरत असणाऱ्या लटके यांनी अंधेरी पोटनिवडणुकीसाठी राजीनामा दिला होता. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now