Share

Anil Parab । “ऋतुजा लटके यांना शिंदे गटाकडून मंत्रिपदाचं अमिष”; अनिल परब यांचा गौप्यस्फोट

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुका तोंडावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट उद्धव ठाकरे यांना झटका देण्याच्या तयारीत आहेत. आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्यात आली आहे. अशातच ऋतुजा लटके या महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देत आहेत. मात्र, शिंदे गट महाविकास आघाडीचा उमेदवार फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं समोर येत आहे.

रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. एक महिन्यानंतर त्यांना त्यांचा राजीमाना चुकीच्या पद्धतीने दिल्याचं सांगितल्याचं सांगून त्यांचा राजीनामा नाकारला गेला. त्यामुळे त्यांनी पुन्हा राजीनामा दिला. ऋतुजा लटके यांना शिंदे गटाकडून मंत्रीपदाची ऑफर देण्यात येत असून त्यांना आपल्याकडे ओढण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केला आहे.

या प्रकरणी आम्ही कोर्टात गेल्याचंही त्यांनी सांगितलं. ऋतुजा लटके यांना आपल्याकडे आणण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असल्याची माहिती समोर येत आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्ष आणि भाजप युतीची उमेदवारी त्यांना द्यावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्न करत आहेत. अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन महापालिका आयुक्त आणि राज्य सरकारवर टीका केली. ऋतुजा रमेश लटके यांनी नियमाने राजीनामा दिला. त्यांच्यावर कोणतंही कर्ज नाही. महापालिकेची कोणतीही शिस्तभंगाची कारवाई झालेली नाही. तरीही त्यांचा राजीनामा मंजूर केला नाही. मी तीनदा आयुक्तांना भेटलो. पण त्यांना वरवरची उत्तरे दिली. त्यावरून महापालिका आयुक्तांवर राज्य सरकारवर दबाव असल्याचं स्पष्ट होत असल्याचं अनिल परब यांनी सांगितलं.

शिंदे गटाकडून ऋतुजा लटके यांना अनेक अमिषे दाखवण्यात येत आहेत. त्यांना मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. पण ऋतुजा लटके या कट्टर शिवसैनिक आहेत. त्या कुठेही जाणार नाहीत. त्या शिवसेनेतच राहतील. त्यांचा राजीनामा मंजूर झाला तर त्या शिवसेनेकडूनच लढतील, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, मुंबई महापालिकेत ऋतुजा लटके कार्यरत होत्या. पोटनिवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आपल्या शासकीय नोकरीचा राजीनामा दिला. मात्र अदयाप त्यांचा राजीनामा स्वीकार करण्यात आलेला नाही. त्यामुळे शिवसेनेतील नेत्यांची धावपळ सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुका तोंडावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट उद्धव ठाकरे यांना झटका देण्याच्या तयारीत आहेत. आमदार रमेश लटके …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now