राष्ट्रवादी कॉंग्रेस मुळेच आघाडीची सत्ता गेली – पृथ्वीराज चव्हाण

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसचे काही निर्णय आघाडी सरकार मध्ये असलेल्या मित्रपक्षाला आवडले नाहीत म्हणून आमची सत्ता गेल्याचा धक्कादायक गौप्यस्पोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

शिखर बँकेवर प्रशासक नियुक्त केल्यावर तोटय़ातील बँक नफ्यात आली. तसेच सिंचनाबाबत आरोप होत असल्याने श्वेतपत्रिका काढली. यामुळे मित्रपक्ष राष्ट्रवादी नाराज झाला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मतांची टक्केवारी ३५ टक्के आहे तर भाजपची २७ टक्के आहे. यामुळे निवडणूक मिळून लढावी, असे मी सांगत होतो. परंतु मित्रपक्ष यासाठी तयार नव्हता. त्याचा लाभ भाजपला झाला. असा आरोप देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

अस असलं तरी सुद्धा आम्ही यावेळेस आघाडी करण्यास तयार आहोत अस म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या दिशेने मैत्रीचा ‘हात’ पुढे केला आहे.