fbpx

हॅप्पी बर्थ डे पप्पा, मला तुमची खूप आठवण येते, रितेशने केली भावनिक पोस्ट शेअर

टीम महाराष्ट्र देशा : आज राज्यभरात दिवंगत नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. तर रितेश देशमुख याने आपल्या बिझी शेड्यूलड मधून वेळ काढत आपल्या सोशल मिडीयावरून आपल्या वडिलांच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

इन्स्टाग्राम अकाउंटवरून रितेशने त्याचे वडील दिवंगत विलासराव देशमुख यांच्या फोटोसह एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये हॅप्पी बर्थ डे पप्पा, मला तुमची खूप आठवण येते, असं लिहीत त्याने वडिलांना जन्मदिनाच्या शुभेच्या दिल्या आहेत.26 मे हा विलासराव देशमुख यांचा जयंतीदिन. विलासराव देशमुख यांचे 14 ऑगस्ट 2012 रोजी निधन झाले.

View this post on Instagram

Happy Birthday Pappa…… I Miss You!!!

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on

अभिनेता रितेश देशमुख सध्या हाऊसफुल-4 आणि मर जावाँ या त्याच्या दोन चित्रपटांमध्ये व्यग्र आहे. त्याबद्दल तो सोशल मीडियावर फारसं काही शेअर करताना दिसत नसला तरी इतर दिवसांना मात्र तो आवर्जून काही ना काही शेअर करत असतो. वडिलांच्या वाढदिवशी त्यांच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या रितेशने त्यांच्या नावे एक पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे.