fbpx

चौथऱ्यावर बसून महाराजांच्या मूर्तीकडे पाठ करून फोटोसेशन करणे निंदनीय : संभाजी राजे

Sambhaji Raje Bhosale

टीम महाराष्ट्र देशा : अभिनेता रितेश देशमुखने काढलेला फोटो चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याच्यावर अनेक माध्यमातून टिका होत आहे. अभिनेता रितेश देशमुख, दिग्दर्शक रवी जाधव, लेखक विश्वास पाटील आणि पाच सहकारी असे पाच जुलैला रायगडावर गेले होते. तिथे त्यांनी राजदरबारातील मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी मेघडंबरीत चढून फोटो काढले होते आणि ते फोटो त्याने सोशल मिडीयावर शेअर केले. त्यानंतर त्याच्या फोटोवर तुफान टीका सुरु झाल्या.

अभिनेता रितेश देशमुखच्या पोस्टवर खासदार संभाजी राजे यांनीही प्रतिक्रिया दिली. चौथऱ्यावर बसून महाराजांच्या मूर्तीकडे पाठ करून फोटोसेशन करणं खरोखरच निंदनीय आहे. अशी प्रतिक्रिया खासदार संभाजी राजे यांनी दिली. तसेच आज होणाऱ्या रायगडावर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत खास नियमावली तयार करण्यात येणार असून, त्यातील नियम सर्वाना बंधनकारक असतील, असंही नमूद केल आहे.

रितेश देशमुखच्या माफिनाम्यानंतर खासदार संभाजी राजे यांनी प्रतिक्रिया दिली.

शिवरायांवरील बायोपिक लवकरच रुपेरी पडद्यावर