त्या पोस्टबद्दल रितेश देशमुखचा माफीनामा

टीम महाराष्ट्र देशा : अभिनेता रितेश देशमुख आणि रवी जाधव यांनी रायगडावर शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यासोबत काढलेल्या सेल्फीवरून शिवभक्त नाराज झाल्यानंतर याप्रकरणात रितेशने माफी मागितली आहे. सोशल मिडीयावरून केलेल्या एका पोस्टमधून त्याने सर्व शिवभक्तांची माफी मागताना कोणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नसल्याचे सांगितले. तसेच आमच्या चुकीमुळे कोणी दुखावलं असेल तर त्याची आम्ही अंत:करणपूर्वक माफी मागत असल्याचे म्हटले आहे.

रितेशने लिहिलेल्या पोस्टमध्ये तो म्हणतो की, ‘आपल्या सर्वांचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वापासून प्रेरणा घेण्यासाठी नुकताच रायगड किल्ल्यावर जाण्याचा योग आला. सर्व शिवभक्तांप्रमाणे मी ही इथल्या वातावरणाने भारावून गेलो होतो.’

Rohan Deshmukh

पुढे या पोस्टमध्ये तो म्हणतो की, महाराजांसमोर नतमस्तक होऊन त्यांच्या पुतळ्याला हार घालून वंदन केले. आजन्म ज्यांच्या पायावर डोकं ठेवलं त्यांच्या पायापाशी कृतज्ञ होऊन बसण्याची इच्छा अनेक वर्षांपासून होती. त्याप्रमाणे आम्ही तिथे बसून आम्ही काही छायाचित्रे घेतली आणि ती सोशल माध्यमातून पोस्ट केली. यामागे फक्त भक्तिभाव होता. ती छायाचित्र घेताना किंवा तिथे बसताना आमच्या मनात कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मात्र आमच्या या कृत्यामुळे कोणीही दुखावलं असेल तर त्यांची आम्ही अंतःकरणपूर्वक माफी मागतो.’

स्मारक शिवछत्रपतींचे महाराष्ट्राच्या अस्मितेचे

Latur Advt
You might also like
Comments
Loading...