जी व्यक्ती तुमच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी जिवंत नाही, तिच्यावर कसले आरोप करता – रितेश

टीम महाराष्ट्र देशा: केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. २६ / ११ रोजी मुंबईवर हल्ला झाला त्यावेळी विलासराव देशमुख यांना आपल्या मुलाला चित्रपटात भूमिका मिळावी म्हणून धडपडत होते, असा आरोप गोयल यांनी केला आहे. आपल्या वडिलांवर करण्यात आलेल्या टिकेनंतर रितेश देशमुखने देखील गोयल यांना प्रत्युत्तर दिले आहे.

Loading...

रितेश देशमुखने ट्विटकरत २६ / ११ रोजी हल्ला झाल्यानंतर आपण ताज/ ऑबेरॉय हॉटेलमध्ये गेल्याचं मान्य केल आहे. मात्र एकाद्या चित्रपटात काम मिळाव म्हणून वडील धडपडत होते, हा आरोप खोटा आहे. माझे वडील मला भूमिका मिळाव्या म्हणून कुठल्याच निर्मात्याशी बोलले नाहीत. मला त्यांचा अभिमान आहे. असं रितेशन म्हंटले आहे.

काय आहे रितेश देशमुखचे ट्विट

२६ / ११ रोजी हल्ला झाल्यानंतर मी वडीलांसोबत ताज/ ऑबेरॉय हॉटेलमध्ये गेलो होते. मात्र मला एकाद्या चित्रपटात काम मिळाव म्हणून ते धडपडत होते हा आरोप खोटा आहे. माझे वडील मला भूमिका मिळाव्या म्हणून कुठल्याच निर्मात्याशी बोलले नाहीत. मला त्यांचा अभिमान आहे. तुम्हाला एखद्या मुख्यमंत्र्यांला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. पण एखादी व्यक्ती जिवंत नसताना तिच्यावर आरोप करणं चुकीचे आहे. सात वर्षांपूर्वी तुम्ही हा प्रश्न विचारला असता तर त्यांनी तुम्हाला उत्तर दिलं असतं, आता उशीर झाला आहे.

पियुष गोयल यांचा आरोप
मी सुद्धा मुंबईकर आहे. मुंबईत २६/११ला झालेला दहशतवादी हल्ला तुम्हाला आठवत असेल. त्यावेळचे केंद्रातील काँग्रेस आघाडीचे सरकार कमकुवत होते. त्यामुळे ते काहीच करू शकत नव्हते. त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख एका निर्मात्याला घेऊन हल्ला झालेल्या पंचतारांकित हॉटेलात आले होते. त्यांना केवळ त्यांच्या मुलाला हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका मिळावी, एवढीच चिंता होती. असा घणाघाती आरोप केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केला आहे.Loading…


Loading…

Loading...