fbpx

रितेश चा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला सुधा अभिमान वाटेल

वेबटिम : रितेश देशमुख हा जितका उमदा कलाकार आहे तेवढाच माणूस म्हणून सुधा तो उमदा आहे. रितेश ने वेळोवेळी आपण शेतकरी पुत्र असल्याच सांगत शेतकऱ्यांसाठी जमेल ती मदत केली आहे .

रितेश देशमुख याने ट्विटर वर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. अमेरिकेमध्ये गणेश चतुर्थी साजरी करत असताना रितेश ने हा व्हिडीओ बनवला आहे. यामध्ये त्याने पर्यावरण पूरक गणपती बाप्पा ची मूर्ती आपल्या हाताने बनवली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याप्रमाणे आपल्याला सुधा शेतकऱ्याप्रती तळमळ असल्याच रितेश च्या या व्हिडिओ मध्ये दिसत आहे. विशेष बाब म्हणजे रितेश ने सर्व शेतकऱ्यांना त्याची ही कलाकृती समर्पित केली आहे.