fbpx

देश चालवायला ५६ इंचाची छाती नाही तर एक चांगल मन लागत : रितेश देशमुख

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींनी ५६ इंच छाती याबाबत एक वक्तव्य केलं होत. त्यावरून विरोधक आता वारंवार मोदींना लक्ष करताना दिसत आहेत. तर आता याच मुद्द्याला उचलून धरत अभिनेता रितेश देशमुख यांनी देखील खिल्ली उडवली आहे. ५६ इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं, असे म्हणत त्यांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली. कॉंग्रेसच्या लातूर येथे घेण्यात आलेल्या प्रचारसभेत तो बोलत होता.

काय म्हणाला रितेश देशमुख ?

तुमच्या खिशातला जो फोन आहे ती कॉंग्रेसची देण आहे, एवढेच नाही तर तुम्ही जे फेसबुक, कॉम्पुटर तुम्ही वापरताय ते सुद्धा कॉंग्रेसमुळेच. पुढे जाऊन तो म्हणाला की , देश चालवायला ५६ इंचाची छाती नाही तर एक चांगल मन लागत. ५६ इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं असंही तो म्हणाला.