fbpx

मराठमोळ्या रितेश आणि जेनेलियाने केली पूरग्रस्तांना मदत, 25 लाखांचा धनादेश केला सुपूर्त

टीम महाराष्ट्र देशा : कोल्हापूर – सांगली येथे आलेल्या महापुरामुळे दोन्ही जिल्ह्यात हलाकीची परिस्थिती आहे. अनेक नागरिक अन्न , वस्त्र , निवारा या मुलभूत गरजांपासून वंचित आहेत. त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांसाठी संपूर्ण राज्यातून मदत केली जात आहे. तसेचं कलाकारांनी देखील या राज्या प्रति असलेले आपले कर्तव्य जाणले आहे. कलाकार रितेश देशमुख यांनी पूरग्रस्तांसाठी मदत केली आहे. 25 लाख रुपयांचा धनादेश रितेश देशमुख आणि त्यांच्या पत्नी जेनेलिया देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: आपल्या ट्विट अकाऊंटच्या माध्यमातून रितेश आणि जेनेलियाने केलेल्या मदतीची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करताना लिहिलं आहे की, रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाख रुपयांचे योगदान दिले. मी त्यांचा आभारी आहे.

दरम्यान कोल्हापूर सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे महापूर आला आहे. हा महापूर अजूनही कायम आहे. काही भागातले पाणी ओसरले आहे. मात्र काही भागात अजूनही घरं पाण्याखाली आहेत. त्यामूळे नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अनेक नागरिक कॅम्पमध्ये आश्रयाला आले आहेत. या नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासन कार्यरत आहे. तर सेवाभावी संस्थांनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. मराठी कलाकार मंडळी देखील या संकटात कोल्हापुर आणि सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेले आहेत.

महत्वाच्या बातम्या