रितेश देशमुख पुन्हा एकदा मराठी चित्रपटात साकारणार ‘लय भारी’ भूमिका

ritesh deshmukh

मुंबई : बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख मराठी चित्रपटसृष्टीत देखील काम करताना दिसतो. रितेशने लय भारी या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. लय भारी नंतर रितेशने माऊली मराठी चित्रपट केला. आता पुन्हा एकदा रितेश मराठी चित्रपट करताना दिसत आहे.

आता पुन्हा एकदा रितेश देशमुख मराठी चित्रपटात  काम करताना दिसणार आहे. ‘अदृश्य’ या थ्रिलरपटात तो दिसणार आहे. बॉलिवूडमधले प्रख्यात फोटोग्राफर कबीर लाल या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण करणार आहेत. या चित्रपटात पुष्कर जोग, मंजिरी फडणीस हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

या चित्रपटातून कबीर आणि रितेश २० वर्षांनंतर एकत्र काम करणार आहेत. ‘तुझे मेरी कसम’ या रितेशच्या पहिल्या चित्रपटाची फोटोग्राफी कबीरने केली होती. तसेच या चित्रपटाबद्दल बोलताना रितेश म्हणाला, ‘मी चित्रपटांत काम करत आहे याचं कारण कबीर लाल हेच आहेत. सुभाष घई दिग्दर्शित करत असलेल्या चित्रपटाच्या सेटवर मी शूटिंग बघायला गेलो होतो. त्यावेळी माझी आणि कबीर यांची भेट झाली. तुझे मेरी कसम या चित्रपटासाठी त्यांनी माझं नाव सुचवलं आणि त्याच चित्रपटानं माझ्या करिअरची सुरुवात झाली. २० वर्षांनंतर त्यांच्याबरोबर काम करताना खूप छान वाटत आहे.’

महत्वाच्या बातम्या 

IMP