fbpx

ट्रक ड्रायव्हर असलेल्या एका निवृत्त सैनिकाचा खोडसाळपणा, दहशतवादी हल्लाची फक्त अफवा

terrorism 2

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रासह 8 राज्यांमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा कर्नाटकच्या पोलिस महासंचालकांनी दिला होता. मात्र, चौकशीवेळी हा खोडसाळपणा ट्रक ड्रायव्हर असलेल्या एका निवृत्त सैनिकाने केल्याचे समोर आले आहे. या निवृत्त सैनिकाला पोलिसांनी अटक केली आहे.

कर्नाटकच्या पोलिसांना एका व्यक्तीने फोन करून ही माहिती दिली होती. यामध्ये त्याने कर्नाटक, महाराष्ट्रासह आठ राज्यांमध्ये हल्ला करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. महाराष्ट्र, गोवा, तमिलनाडु, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगानासह 8 राज्यांना अलर्टच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा चौथा आणि महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा असलेल्या मुंबईमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. ही माहिती देताना ट्रक चालकाने त्याचे नाव स्वामी नाथा पूरम असल्याचे सांगितले होते.