मराठी सिनेसृष्टीतील उगवता तारा …केतन पेंडसे

blank

टीम महाराष्ट्र देशा- मराठी सिनेसृष्टीत कसदार अभिनय करणाऱ्या कलाकारांची कमतरता नाही. सोनाली कुलकर्णी (सिनियर),सुबोध भावे,प्रशांत दामले,उपेंद्र लिमये,मुक्ता बर्वे,स्वप्नील जोशी,यासारखे असंख्य स्टार्स मराठी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. या कलाकारांच्या पावलांवर पाउल ठेवत काही नवीन कलाकार या क्षेत्रात पदार्पण करत आहेत. अश्या उगवत्या ताऱ्यांच्या आणि गुणी कलाकारांच्या मुलाखती ‘महाराष्ट्र देशा’ खास वाचकांच्या आग्रहाखातर घेवून येत आहे. केतन पेंडसे या गुणी कलाकाराची प्रतिनिधी अभिजित कांबळे यांनी घेतलेली  मुलाखत.

उगवता तारा ,केतन पेंडसे

प्रश्न –  मीडिया करिअर ची सुरुवात कशी झाली ?
उत्तर – मी एम आय टी कोथरूड मधून BE Computer केले नंतर मुंबईआय टी कंपनीमध्ये 2 वर्ष जॉब केला. जॉब करत असताना मोडेलिंगसाठी ऑफर आली आणि 2014 मध्ये मोडेलिंगची सुरुवात केली. काही Fashion shows तर काही Fashion competition केल्यात. मराठी कलाकार श्रुती मराठे, सौरभ गोखले यांच्या सोबत रॅॅम्प वॉक केले.

प्रश्न – हिंदी कलाकारांसोबत केलेल्या shows बद्दल काही ?
उत्तर – Fashion show competition करत असताना सोनाली कुलकर्णी सोबत फॅशन शो केला, तिच्या कडून बेस्ट मोडेल आणि बेस्ट स्माईल चे अवॉर्ड मिळाले तसेच bollywood star अस्मित पटेल यांच्याकडून बेस्ट स्माईल चे अवॉर्ड मिळाले. 2015 मध्ये हिंदी TV स्टार पारूळ चौहान आणि Mrs India 2013 winner पूजा ठाकूर सोबत grand fashion show पुण्यात केला. तसेच bollywood कलाकारांसोबत काम केलेत.

blank

प्रश्न – चित्रपटांमध्ये Entry कशी झाली ?
उत्तर – Modeling करत असताना glamfame entertainment बॅनर चा 1st मराठी चित्रपट मिळाला प्रथम नायक म्हणून त्यामध्ये खुशबू तावडे, निरंजन कुलकर्णी, संस्कृती बालगुडे, hollywood आणि bollywood स्टार Elena Kazan and अस्मित पटेल सोबत काम केले या चित्रपट साठी उदित नारायण यांनी playback singer म्हणून आवाज दिला. 2016 मध्ये एक thriller night release झाली.

https://www.youtube.com/watch?v=71mJzyH31EE

प्रश्न – upcoming project बद्दल काय ?
उत्तर – EK thriller night 2016 नंतर दुसरा मराठी चित्रपट लगेच मिळाला तेव्हा मुख्य नायक आणि लेखक अभिराम भडकमकर सोबत मुख्य रोल केला तसेच ओंकार कर्वे यांच्या सोबत काम केले. नंतर 2017 मध्ये शर्वरी लोहकारी सोबत Confuse या मराठी चित्रपटात काम केले. नुकतेच मुंबई मध्ये Love betting या मराठी चित्रपटाचे काम पूर्ण झाले त्यात स्मिता गोंदकर आणि चिराग पाटील सॊबत काम केले तसेच पुण्यात पुन्हा 26-11 या social issue चित्रपटामध्ये सुनील गोडबोले, सरोज राव आणि मिताली सोबत मुख्य भूमिका बजावली. या वर्षी हे 4 चित्रपट release होतील.

प्रश्न – हिंदी चित्रपट पद्द्ल आणि Direction बद्दल काही ?
उत्तर -हिंदी मध्ये काम करायचे होतेच पण चांगल्या संधीची वाट बघत होतो आणि त्यात गुमनाम नावाची horror फिल्म मिळाली या चित्रपटाचे काम नुकतेच पूर्ण झाले असून यामध्ये director म्हणून जबाबदारी सांभाळली.

प्रश्न – पुरस्काराबद्दल काही ?
उत्तर – ‘एक थ्रिलर नाईट’साठी NIFF ( Nasik International Film Festival ) मध्ये Best debue actor चा पुरस्कार मिळाला तो पण आदरणीय फेमस कलाकार निम्मी ह्यांच्या कडून ही खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट होती माझ्यासाठी.

प्रश्न – आता सद्या काय सुरू आहे ?
उत्तर – नुकतेच हिंदी तेरे बिन नावाचा music album केला आणि आता Aनवं सोबत माझ्या प्रेमाची गोष्ट नावाची youth Love स्टोरी based web series शूट सुरू आहे.

प्रश्न – या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना के सांगाल ?
उत्तर – कष्ट, परिश्रम जर केलं तर नक्कीच यश मिळेल आणि काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही लवकरच लोकांपर्यंत पोहोचाल.

‘लस्ट स्टोरीज’मधील ‘तो’ प्रकार पाहून मंगेशकर कुटुंबीय संतापले

मराठमोळी सोनाली आहे पंजाबी कुटुंबाची सून