पत्रकार शुजात बुखारी यांची हत्या हाफिज सईदच्या आदेशानुसारच

टीम महाराष्ट्र देशा : जम्मू काश्मिरमधील ‘रायझिंग काश्मिर’ वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांची हत्या अतिरेकी हाफिज सईदच्या आदेशानुसारच झाल्याची धक्कादायक माहिती जम्मू पोलिसांनी दिली आहे.

रमजानच्या महिन्यात भारतानं केलेल्या शस्त्रसंधीचं समर्थन आणि या काळातील दहशतवादी हल्ले आणि पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघन यावर शुजात बुखारी यांनी विखारी टीका केली होती.

त्यामुळे नाराज झालेल्या ‘लष्कर ए तोयबा’ ने गुल याच्यावर बुखारींच्या हत्येची जबाबदारी सोपवली होती. 48 वर्षांचा सज्जाद गुल हा मूळचा काश्मिरचाच आहे. बंगळुरुमधून एमबीएचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो लष्कर ए तोयबामध्ये सामील झाला होता.

दरम्यान, शुजात बुखारी यांची 14 जून रोजी गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. श्रीनगरमधील वृत्तपत्र कार्यालयाबाहेर अज्ञात बंदुकधाऱ्यांनी बुखारींवर गोळीबार केला.

You might also like
Comments
Loading...