ऋषी कपूरच्या बहुचर्चित ‘मुल्क’ चा ट्रेलर रिलीज

टीम महाराष्ट्र देशा : तापसी पन्नू आणि ऋषी कपूर यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘मुल्क’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. रजत कपूर, आशुतोष राणा, नीना गुप्ता यांचीदेखील या सिनेमात महत्वाची भूमिका असून सिनेमात तापसी पन्नू वकीलाच्या भूमिकेत बघायला मिळेल.

‘मुल्क’ या सिनेमाचे दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केलं असून ३ ऑगस्ट ला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. ‘मुल्क’ या सिनेमातून धार्मिक कट्टरता आणि दहशतवादासारख्या गंभीर विषयांवर भाष्य केलं गेलं. तसेच काही लोकांच्या चुकीमुळे संपूर्ण समाजालाच बदनाम करण्याच्या मानसिकतेलाही फटकारण्याचा प्रयत्न या सिनेमातून करण्यात आला आहे.

Rohan Deshmukh

पीव्हीआरच्या मॅनेजरला मारहाण केल्याप्रकरणी मनसेच्या किशोर शिंदेंना अटक

 

Latur Advt
You might also like
Comments
Loading...