रिषभ पंतची जागा सांभाळणार टीम इंडियाचा ‘हा’ प्रमुख खेळाडू

रिषभ पंतची जागा सांभाळणार टीम इंडियाचा ‘हा’ प्रमुख खेळाडू

rishbh pant

इंग्लंड : गेल्या काही दिवसापासुन भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाने डब्ल्युटीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळल्यानंतर काही काळासाठी भारतीय संघ सुट्टीवर गेला होता. यानंतर आगामी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ विलगीकरणात पोहोचणार होता, मात्र यादरम्यान दोन भारतीय खेळाडूंना कोरोनाची लागण झाली अशी धक्कादायक माहिती समोर आली.

कोरोनाची लागण झालेल्या दोन भारतीय क्रिकेटपटुपैकी एक खेळाडू हा युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत हा असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर थ्रो-डाऊन एक्सपर्ट दयानंद गरानी यांना कोरोनाची लागण झाली. तसेच त्यांच्या संपर्कात आलेला दुसरा यष्टिरक्षक रिद्धीमान साहासह गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण व पर्यायी सलामीवीर अभिमन्यू इस्वरन या सर्वांनाही विलीगीकरणात ठेवण्यात आले आहे.

त्यानंतरही इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही. या दौऱ्यातील पहिली प्रॅक्टीस मॅच 20 जुलैपासून डरहॅममध्ये सुरु होणार आहे. या मॅचमध्ये ऋषभ पंत खेळणार नाही. त्याच्या जागी केएल राहुल विकेट किपरची जबाबदारी सांभाळेल. पण राहुलचा ओपनिंग बॅट्समन म्हणून विचार करत नसल्याचं टीम मॅनेजमेंटनं यापूर्वीच स्पष्ट केले होत. त्यामुळे तो प्रॅक्टीस मॅचमध्ये मधल्या फळीत फलनदाजीला उतरेल.

20 जुलै रोजी सुरू होणारी प्रॅक्टीस मॅच टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे कॅप्टन विराटवर दबाव वाढणार आहे. तसेच बाकीच्या खेळाडूंवरही दबाव राहील.

महत्वाच्या बातम्या