मुंबई : ऋषभ पंत हा निडर खेळाडू असून अवघ्या काही षटकांत सामन्याची दिशा बदलण्याची क्षमता त्याच्यात आहे. पण त्याची बॅट गेल्या काही दिवसांपासून शांत आहे. महत्त्वाचं म्हणजे टी-२० मध्ये तो त्याच्या नावानुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतही हे आतापर्यंत पाहायला मिळाले आहे. पंत नशीबवान होता की केएल राहुलच्या दुखापतीमुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी मिळाली. मात्र या मालिकेत नेतृत्व करत असताना ऋषभ पंतवर वेळोवेळी दडपण आल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या कर्णधारपद आख आली त्याने मागील तीन सामन्यात बॅटने चांगली कामगिरी केलेली नाही. संधी असूनही त्याला मोठी खेळी करता आलेली नाही. अशीच कामगिरी पुढेही सुरू राहिली तर कदाचित त्याला टी-२० संघात स्थान मिळणार नाही. असे मत भारताचा माजी सलामीवीर आणि क्रिकेट तज्ज्ञ वासिफ जाफरने व्यक्त केले आहे. जाफरचे असे म्हणणे आहे की, पंत सध्या ज्या प्रकारच्या फॉर्ममध्ये आहे ते पाहता यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संघात त्याचे स्थान निश्चित नसणार आहे.
वसीम जाफर ईएसपीएन क्रिकइन्फोवर बोलताना म्हणाला की,”तुमच्याकडे केएल राहुल सारखा खेळाडू आहे. दुखापतीतून परतल्यावर त्याचे संघातील स्थान निश्चित होणार आहे. तो संघासाठी यष्टीरक्षकाचीही भूमिका बजावू शकतो. जर तुम्ही दिनेश कार्तिकला खेळवला तर तोही यष्टिरक्षक आहे. त्यामुळे पंतचा अलीकडचा फॉर्म पाहता, टी-२० संघात त्याचे स्थान निश्चित असेल, असे मला वाटत नाही.”
टी-२० संघात पंतचे स्थान निश्चित नाही
जाफर पुढे म्हणाला की, “पंतला सातत्याने धावा कराव्या लागतील आणि त्याच्या कामगिरीत सातत्य आणावे लागेल. आयपीएल २०२२ मध्येही त्याने चांगली कामगिरी केलेली नाही. टी-२० मधील त्याची कामगिरी काही काळापासून अतिशय खराब राहिली आहे. पंत ज्या प्रकारे कसोटी क्रिकेट खेळला आहे, ते मी यापूर्वीही अनेकदा सांगितले आहे. वनडेतही काही चांगल्या खेळी खेळल्या आहेत. पण हा यष्टिरक्षक फलंदाज टी-२० मध्ये सध्या अपयशी ठरत आहे. त्यामुळे माझ्या मते, ऋषभ पंतचे टी-२० संघातील स्थान निश्चित झालेले नाही.”
पंतची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ टी-२० मध्ये कामगिरी
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पंतने ३ टी-२० मध्ये आतापर्यंत एकूण ४० धावा केल्या आहेत. यापूर्वी त्याने आयपीएल २०२२ च्या १४ सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी १५१ च्या स्ट्राइक रेटने ३४० धावा केल्या होत्या. मात्र संपूर्ण मोसमात त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. पंत वेगाने धावा करण्याचा प्रयत्न करत आहे. पण या प्रकरणात तो बाद होताना दिसत आहे. त्यामुळेच तो कसोटी आणि एकदिवसीय सारखा टी-२० मध्ये आक्रमक फलंदाज म्हणून आपली छाप सोडू शकलेला नाही.
महत्वाच्या बातम्या: