षटकार ठोकून ऋषभ पंतचे कसोटी पदार्पण

टीम महाराष्ट्र देशा : भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरु असणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 6 बाद 307 धावा केल्या होत्या. या सामन्यात भारताकडून ऋषभ पंत याने पदार्पण केले. या पदार्पणाच्या सामन्यातच त्याने एक अनोखी कामगिरी केली आहे, जी आजपर्यंत कोणत्याही भारतीय फलंदाजाला करता आली नाही.

याआधी भारताच्या 19 वर्षाखालील संघाकडून आणि भारत अ संघाकडून खेळताना ऋषभने आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले होते. इंग्लंडसारख्या संघाविरुद्ध पदार्पणाची संधी मिळालेल्या ऋषभने षटकार मारत धावसंख्या केली. विशेष म्हणजे त्याने दुसऱ्याच चेंडूवर षटकार मारला. अशी कामगिरी करणारा ऋषभ जगातील 12वा तर पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

डॉ. दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या सचिन अंदुरेला ७ दिवसांची पोलीस कोठडी