मुंबई : पाकिस्तानचा माजी क्रिकेटर दानिश कनेरियाने भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पंतने सध्या नेतृत्व करू नये, असे कनेरियाने म्हटले आहे. दानिश कनेरियाच्या मते, ऋषभ पंत अद्याप कर्णधारपदासाठी पुरेसा परिपक्व झालेला नाही. तो कॅप्टन्सीच्या लायक नाही. त्याचबरोबर कर्णधारपद मिळाल्यानंतर त्याचा परिणाम त्याच्या फलंदाजीवर होतो.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेदरम्यान, कर्णधार ऋषभ पंतवर बरीच टीका झाली होती. कधी त्याच्या निर्णयांमुळे, तर कधी त्याच्या फलंदाजीमुळे तो चर्चेत राहिला. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. भारतीय संघाने पुढील दोन सामने जिंकून मालिकेत बरोबरी साधली असली तरी शेवटचा सामना पावसामुळे रद्द झाला. परिणामी मालिका २-२ अशी बरोबरीत संपली. त्यांच्या काही निर्णयांवर बरीच टीकाही झाली. त्याचबरोबर फलंदाज म्हणून निष्काळजीपणे फटके खेळून बाद झाला. पाच डावात त्याच्या बॅटमधून केवळ ५८ धावा आल्या.
दानिश कनेरियाच्या म्हणण्यानुसार, ”या मालिकेत ऋषभ पंतची कर्णधारपदाची कामगिरी चांगली नव्हती. पंत अद्याप कर्णधारपदासाठी पुरेसा परिपक्व झालेला नाही. त्याला दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेत संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली पण त्याने नेतृत्व फारच खराब केले. कर्णधारपदामुळे त्याच्या फलंदाजीवरही बराच परिणाम झाला. माझ्या मते त्याने आता नेतृत्व करू नये.”
महत्त्वाच्या बातम्या –
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<