सेल्फ आइसोलेशनच्या काळात रिषभ पंत असा वेळ घालवतोय, केला व्हिडीओ शेअर

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनायरसशी लढण्यासाठी 21 दिवसांचा संपूर्ण लॉकडाउन जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत सर्व क्रिकेटर्स घरी राहून सेल्फ आइसोलेशन प्रक्रियेतून जात आहेत. क्रिकेटर्स घरात राहून आपल्या तंदुरुस्तीवर काम करत असताना अनेक क्रिकेटपटू घरांच्या कामात मदत करत आहेत. याशिवाय भारताचा यष्टीरक्षक रिषभ  पंत लॉकडाऊनमध्ये आपला वेळ वेगळ्या प्रकारे व्यतीत करत आहे.

रिषभ पंत पतंग उडवून घरात आपला वेळ घालवत आहे. पंत यांनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो पतंग उडवताना दिसत आहे. यासह   पंत त्यांच्या फिटनेसवर देखील काम करत आहेत. बीसीसीआयने आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये तोपुश-अप लावताना दिसत आहेत.

दरम्यान कोरोनाव्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 149 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, भारतात या विषाणूमुळे पीडित लोकांची संख्या 873 वर गेली आहे. कोविड -19 मुळे आतापर्यंत १९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.