fbpx

ऋषभ पंतकडून मला धोका नाही : ऋद्धीमान सहा

टीम महाराष्ट्र देशा : ऋषभ पंतने मिळालेल्या संधीचा फायदा करून घेतला आणि सातत्याने रन केले. आता माझं लक्ष्य फॉर्ममध्ये येऊन भारतीय टीममध्ये पुनरागमन करणं आहे अस म्हणत ऋद्धीमान सहा ने ऋषभ पंतकडून मला धोका नाही असे स्पष्टीकरण दिले आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सीरिजमध्ये ऋषभ पंतनं केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे भारताच्या कसोटी संघात आपले स्थान सध्यातरी भक्कम केले आहे. त्यामुळे ऋद्धीमान सहा याचे कसोटी संघातील स्थान धोक्यात येण्याची शक्यता आहे.

खांद्याच्या दुखापतीमुळे ऋद्धीमान सहा हा संघाबाहेर बसला होता. तर त्याच्या ऐवजी ऋषभ पंत याला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सीरिजमध्ये संधी देण्यात आली. या मिळालेल्या संधीचा फायदा करत ऋषभ पंत या दोन देशांच्या दौऱ्यांमध्ये ७ सामने खेळत ५१२ धावा केल्या. परदेशी मैदानांवर केलेली शतकं ही ऋषभ पंतची उजवी बाजू ठरली.

दरम्यान दुखापतीनंतर ऋद्धीमान सहा याने सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतून क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. त्यामुळे भविष्यात भारताच्या कसोटी संघात ऋद्धीमान सहा असेल की ऋषभ पंत याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

3 Comments

Click here to post a comment