नवी दिल्ली : ऋषभ पंतने (Rishabh Pant) कसोटी क्रिकेटमध्ये विकेटकीपिंगचा नवा विक्रम केला आहे. या फॉरमॅटमध्ये तो सर्वात जलद 100 झेल घेणारा भारतीय ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आणि ऋद्धिमान साहाच्या (Wriddhiman Saha) नावावर होता. हा विक्रम दोघांच्या नावावर संयुक्तपणे होता. ऋषभ पंतने टेम्बा बवुमाला (Temba Bavuma) विकेटच्या मागे आपला 100 वा बळी बनवला.
धोनीला मागे टाकण्यासाठी पंतला या सामन्यापूर्वी 3 झेल हवे होते. तिसऱ्या दिवसाच्या खेळातच त्याने तीन झेल घेत हा विक्रम केला. हा आकडा गाठण्यासाठी पंतने 26 कसोटी सामने खेळले आहेत. धोनी आणि साहा यांनी ३६-३६ कसोटी सामने खेळले. किरण मोरेने यासाठी 39 कसोटी सामने घेतले.
दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात ऋषभ पंतने ग्लोव्हजमध्ये चार झेल घेतले. त्याने डीन एल्गर, विआन मुल्डर, टेम्बा बावुमा आणि कागिसो रबाडा यांचे झेल घेतले. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या 197 धावांत ऑल आऊट झाला आणि टीमइंडियाने 130 धावांची मोठी आघाडी घेतली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भ्रष्टाचाराच्या दृष्टीने विद्यापीठ कायदा दुरुस्ती विधेयक मंजूर केले’, भाजपचा आरोप
- ‘कुणावर हल्ला घडवून आणण्याची वृत्ती वाळव्याच्या पाटलांची नाही’, राऊतांकडून जयंत पाटलांची पाठराखण
- “भाजप पुढाऱ्यांच्या डोक्याचा केमिकल लोचा”, संजय राऊतांची खोचक टीका
- “विरोधी पक्ष मांजरीचा वंशज असल्याने…” ; शिवसेनेची खोचक टीका
- ‘श्रीधर नाईकापासून, रमेश गोवेकरांपर्यंत ज्या हत्या झाल्या त्याच मालिकेत संतोष परबांनाही बसवायचे होते’