आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातही रिषभ पंत कर्णधार; दिल्ली कॅपिटल्सची घोषणा

rishbh pant

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामातील उर्वरित सामने या आठवड्यापासून सुरू होणार आहेत. स्पर्धेचे उर्वरित 31 सामने 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहेत. क्रिकेट फॅन्समध्ये आता आयपीएलची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यावेळी यूएईमध्ये प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार असल्यानं त्यांचा आनंद अधिक द्विगुणीत झाला आहे.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाला. यानंतर बीसीसीआयने तातडीने स्पर्धा स्थगित केली होती. काही दिवसातच बीसीसीआयने उर्वरीत स्पर्धा युएईमध्ये होणार असल्याची घोषणा केली होती.

यादरम्यान दिल्ली कॅपीटल्स संघाच्या कर्णधार पदाबद्दल अनेक चर्चांना उधान आले होते. कारण दिल्ली कॅपीटल्सचा नियमीत कर्णधार श्रेयस अय्यर खांद्याच्या दुखापतीमुळे आयपीएल २०२१ स्पर्धेत सहभागी झाला नव्हता. त्याच्या अनुपस्थीतीत रिषभ पंतने दिल्लीच्या संघाची धुरा संभाळली होती. स्पर्धा स्थगीत होण्यापुर्वी रिषभच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ गुणतालीकेत अव्वल स्थानी होता.

मात्र आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रात श्रेयस अय्यरचे संघात पुनरागमन झाले. अय्यरच्या पुनरागमनानंतर दिल्लीच्या कर्णधारपदाची धुरा कुणाच्या खांद्यावर दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष्य होते. मात्र आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सने अखेर संघाच्या कर्णधारपदावरील वादाला पूर्णविराम दिला आहे. दिल्ली कॅपिटल्सने स्पष्ट केले आहे की रिषभ पंत आयपीएलच्या 14 व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्पातही संघाचा कर्णधार राहील.

महत्त्वाच्या बातम्या