रिंकूचा ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

रिंकू

मुंबई : ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. रिंकूने शेअर केलेल्या या व्हिडिओत गोड हसताना दिसत आहे. रिंकूच्या या व्हिडीओवरती चाहते घायाळ झाले आहेत. रिंकू अगदी सध्या मेकअपमध्ये देखील खूपच सुंदर दिसत आहे.  तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून तिच्या या व्हिडिओची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे. या व्हिडिओत  तिने साडी परिधान केली आहे. साडीमुळे रिंकूच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा ॲमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती. या शिवाय रिंकू राजगुरूने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. रिंकू राजगुरू शेवटची हंड्रेड या वेबसीरिजमध्ये झळकली होती. याशिवाय रिंकू राजगुरू अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 18 जूनला प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP