प्लॅस्टिक बंदीची जनजागृती रिंकू, सिद्धार्थ करणार ?

मुंबई  : प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यासाठी राज्य सरकारतर्फे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव यांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Loading...

मार्चपासून ही बंदी लागू होणार आहे. प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यासाठी रिंकू आणि सिद्धार्थ या दोघांचे नाव चर्चेत आहे. मात्र अद्यापही याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. रिंकू आणि सिद्धार्थ यांच्या व्यक्तीरिक्त बॉलिवूडमधल्या एखाद्या मोठ्या कलाकराची निवड केली जाणार असल्याचीही चर्चा सुरू आहे.

एकूण ५ ब्रॅण्ड अॅम्बेसेडर नेमण्याचा विचार सुरू असून ते शहरी आणि ग्रामीण भागात सरकारच्या प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाचा प्रसार आणि प्रचार करणार आहेत.Loading…


Loading…

Loading...