fbpx

रिंकूच्या ‘कागर’ चा ट्रेलर आउट !

टीम महाराष्ट्र देशा : सैराट चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करणारी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूचा वायाकॉम१८ स्टुडीओज प्रस्तुत ‘कागर’ चित्रपटाचा ऑफिशियल ट्रेलर नुकताच आउट झाला आहे. हा चित्रपट येत्या २६ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

सध्या देशभरात निवडणुकीचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर ग्रामीण राजकारणावर आधारित रिंकू राजगुरूचा कागर हा चित्रपट येत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मकरंद माने यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केला आहे. चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. सैराट च्या यशानंतर रिंकू चे चाहते तिच्या नव्या चित्रपटाच्या प्रतीक्षेत होते. कागर च्या माध्यमातून ती पुन्हा परतली आहे.