काय सांगता ? घरात राहून आर्ची करतेय चक्क ‘हे’ काम…

blank

मुंबई : कोरोना विषाणूंचा संसर्ग न व्हावा यासाठी केंद्र सरकारने देशभरात सध्या लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नका, असं आवाहन अनेक सेलिब्रेटी सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत.

याच प्रमाणे बॉलिवूडच्या सर्व कलाकारांनी लॉकडाऊनमुळे स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतलं आहे. दररोज धावपळ, काम, शूटिंग यामुळे त्यांना कुटुंबासोबत वेळ घालवता येत नाही. मात्र अनेक सेलिब्रेटी लॉकडाऊन दरम्यान आपला वेळ कसा घालवत आहेत, याबाबत नागरिकांना सांगत आहेत.

तसेच रिंकू राजगुरूने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत ती किचनमध्ये दिसत असून ती तिच्या आईला स्वयंपाक करताना मदत करत आहे. ती या व्हिडिओत चपात्या करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.

blank

दरम्यान, या व्हिडिओसोबत तिने तिच्या चाहत्यांना एक संदेश दिला आहे. तिने या व्हिडिओसोबत एक कॅप्शन दिली आहे. तिने लिहिले आहे की, घरी रहा. आईला घरकामात मदत करा, पुस्तकं वाचा, फिल्म बघा, चित्रं काढा, व्यायाम करा… काळजी घ्या…, असं रिकू ने सांगितलं आहे.