SSC- आणि आर्ची पास झाली

सैराट चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेली आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. रिंकूने 10 वीच्या परीक्षेत 66 टक्के गुण मिळवून अभिनयाबरोबरच शिक्षणात देखील चुणूक दाखवली आहे. रिंकू उत्तीर्ण झाल्याच्या बातम्या सध्या माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत. मात्र तिच्या कुटुंबियांकडून अजून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
यंदा दहावीचा एकूण निकाल ८८.७४ टक्के लागला आहे. बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलांचे पास होण्याचे प्रमाण ८६.५१ टक्के असून मुलींची टक्केवारी ९१.४६ आहे.

कोल्हापूर-९३.५९,

पुणे-९१.९५,

मुंबई-९०.०९,

औरंगाबाद-८८.१५,

लातूर-८५.२२,

नागपूर-८३.६७,

अमरावती ८४.३५,

नाशिक-८७.७६