Ringan- आवर्जून पहावा असा ‘रिंगण’

महाराष्ट्र देशा स्पेशल : राष्ट्रीय पुरस्कार विजेता,लँडमार्क फिल्म्स प्रस्तुत ‘रिंगण’ चित्रपट आज  प्रदर्शित झाला. परिस्थितीपुढे हतबल झालेला शेतकरी बाप आणि त्याचा निरागस मुलगा यांची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. बाप-लेकाचं हळवं नातं दाखवणारा हा चित्रपट थेट हृदयाला भिडतो.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा तसा वर्षानुवर्षे चर्चेतच अडकलेला विषय. मात्र जेव्हा सगळेच मार्ग बंद झाले आहेत असं ज्यावेळी वाटतं तेव्हा  कर्जमुक्ती मिळवण्यापेक्षा देहमुक्तीचा मार्ग जवळ करणाऱ्या शेतकऱ्याच्या मनात शिरून त्यातूनही वाट काढता येते, असं विश्वासार्ह चित्र  मकरंद माने दिग्दर्शित ‘रिंगण’ या चित्रपटात रंगवण्यात आलं आहे . २०१५ साली सर्वोत्कृष्ट मराठी  चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कराचा मानकरी ठरलेला हा चित्रपट पाहताना  हा चित्रपट वेगळा का आहे याचं उत्तर मिळतं.

Loading...

‘रिंगण’ हा मकरंदचा दिग्दर्शक म्हणून तर  साहिल जोशी याचाही हा  बालकलाकार म्हणून पहिलाच चित्रपट . शशांक शेंडे या चित्रपटात बापाच्या भूमिकेत असून शशांक ने तगड्या अभिनयाने सर्वांचीच मने जिंकून घेतली आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर मुलाच्या भूमिकेत असणाऱ्या बालकलाकार साहिल जोशी याने देखील  दमदार पदार्पण केलं आहे. या दोघांच्या नात्याचा अंतर्शोध घेणाऱ्या भावस्पर्शी प्रवासाचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच कर्जबाजारीपणामुळे खचलेला अर्जुन मगर(शशांक शेंडे) आत्महत्या करून मुक्ती मिळविण्याच्या तयारीत असल्याचं पहायला मिळतो तर दुसऱ्या बाजूला छोटा अभिमन्यू (साहिल जोशी) देवाघरी गेलेल्या आई च्या शोधात आहे. सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही तर जमीन जाणार ही टांगती तलवार डोक्यावर लटकत असताना नातेवाईकांकडून  मदत मिळेल या आशेने सगळ्यांकडे हात पसरतो मात्र हाती लागते ती फक्त निराशा.दुसऱ्या बाजूला अभिमन्यू ला काहीही करून आई पाहिजे .जेव्हा दोघांचे सगळे मार्ग बंद होतात तेव्हा पंढरपूर चा विठ्ठल या संकटातून बाहेर काढेल असा दोघांनाही ठाम विश्वास असतो . विठुरायाला साकडे घालण्यासाठी दोघे पंढरपूरला पोहचतात आणि सुरू होतो एक नवा संघर्ष .जगण्याची उमेद सोडलेल्या अर्जुनला विठ्ठल भेटतो का? आईच्या शोधतील अभिमन्यू ला आई भेटते का?बापलेकाची ही जोडी परिस्थिच्या चक्रव्युवहातून बाहेर पडते का? सगळ्यांनाच मार्ग दाखवणाऱ्या या विठ्ठलाच्या साथीने बाप – लेकाला कोणता मार्ग सापडतो आणि त्यावर चालताना काय – काय अडचणी त्यांच्या वाट्याला येतात याचं सुंदर चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे.

प्रत्येक फ्रेमचा विचार दिगदर्शकाने केला असल्यामुळे सिनेमा पाहताना तुम्ही बोअर होत नाही. वैभव देशमुख,दासू वैद्य लिखित गाणी आणि अजय गोगावले,आदर्श शिंदे यांचा आवाज यामुळे हा चित्रपट अजूनच खुलला आहे. बाप लेकच्या अमर्याद प्रेमाचे व संघर्षाचे चित्रण या सिनेमातून करण्यात आले असले तरीही सुहास शिरसाठ, उमेश जगताप,केतन पवार यांनी देखील आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत.

प्रामाणिकपणा,एकाग्रता,आणि कठीण परिस्थितीतही संघर्ष करत,खंबीरपणे जबाबदारीने कसे लढायचे हे शिकवणारा हा चित्रपट नक्की पहा

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू