जिओ ची फ्री कॉलिंग बंद तर व्होडाफोन-आयडिया देणार फ्री कॉलिंग

 

टीम महाराष्ट्र देशा : दिवाळीआधी रिलायन्स जिओने फ्री कॉलिंगची सेवा बंद करण्याचा निर्णय घेत आपल्या ग्राहकांना दणका दिला आहे. भारतातील तब्बल ३५ कोटी जिओ ग्राहकांवर या निर्णयाचा परिणाम होणार आहे. त्यामुळे आता जिओ व्यतिरिक्त अन्य नेटवर्कसोबत कॉल करण्यासाठी प्रती मिनिट सहा रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. टर्मिनेशन चार्जशी संबंधीत नियमांमुळे जिओने आपली कॉलिंग पॉलिसी बदलली आहे. हा बदल पुढील बुधवार (ता. १६ ) पासून सुरु करण्यात येणार आहे.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)द्वारे प्रतिस्पर्धी नेटवर्क कंपन्यांच्या क्रमांकावर कॉल केल्यास संबंधित कंपनीला सेवा पुरवठादार कंपनीनं ६ पैसे प्रति मिनिट शुल्क देण्याचे निर्देश दिले होते. विशेष म्हणजे आधी १४ पैसे प्रति मिनिट असलेला हा दर त्यावेळी ६ पैसे प्रति मिनिट करण्यात आला. त्यामुळे ‘जिओ’नेही आतापर्यंत आपल्या ग्राहकांवर कोणतेही शुल्क लागू केले नाही. मात्र आता या निर्णयामुळे पहिल्यांदाच ‘जिओ’ ग्राहकांना यापुढे केल्या जाणाऱ्या कॉलिंगचे पैसे भरावे लागणार आहेत.

मात्र ”आम्ही तुम्हाला जे आश्वासन दिलं होतं त्याचा आनंद घ्या. व्होडाफोन अनलिमिटेड प्लॅन्सवर फ्री कॉल’ असं ट्वीट करत व्होडाफोन-आयडिया कंपनीने अनलिमिटेड कॉल फ्री देण्याची घोषणा केली आहे. आज गुरुवारी (ता. १० ) या संबंधी एक मोठी घोषणा करण्यात आली. यापुढे  व्होडाफोन-आयडिया युजर्सना आता दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी कोणतेही चार्जेस द्यावे लागणार नाहीत.

व्होडाफोन आयडियाच्या प्लॅनमध्ये सुरुवातीचा ११९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे. २८ दिवस व्हॅलिडीटी, १ जीबी डेटा आणि अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलची सुविधा या प्लॅनमध्ये मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी व्होडाफोनने आयडियाला विकत घेतल्याने जिओचा नंबर घसरला होता. व्होडाफोन आयडियाने पुन्हा एकदा सर्वाधिक अॅक्टिव सबस्क्रायबर्स जोडले आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या :