मुख्यमंत्र्यांना टमरेल भेट देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृह नाहीत, तरीही मुंबईला हगणदारीमुक्त शहर घोषित करण्याच्या निर्णयाचा व्यक्त केला निषेध

मुंबई :मुंबईत महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृह नाहीत, तरीही मुंबईला हगणदारीमुक्त शहर घोषित करण्यात आलं आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी तसेच मुख्यमंत्र्यांना अस्वच्छ शौचालयांचे फोटो आणि टमरेल भेट देण्यासाठी गेलेल्या राईट टू पी च्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी या महिला कार्यकर्त्यां भेटायला गेल्या होत्या. मात्र मुख्यमंत्र्यांनी या महिला कार्यकर्त्यांना भेट नाकारली. तरीही मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा या महिला कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेतलं.