चंद्रकांत पाटलांची काँग्रेस-आघाडी सत्तेवर येईल ही भिती निरर्थक: रावसाहेब दानवे

औरंगाबाद : शिवसेना आणि भाजप युती न झाल्यास कॉंग्रेस पुन्हा एकदा सत्तेत येईल, असं वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते. त्यामुळे भाजपची मध्ये चांगलीच राजकीय चर्चा रंगली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांशी बोलतांना चंद्रकांत पाटील यांचा मुद्दा खोडून काढला.

रावसाहेब दानवे म्हणाले, शिवसेनेशी युती झाली नाही तर काँग्रेस-आघाडी सत्तेवर येईल ही भिती निरर्थक असून भाजपचे राज्यातील संघटन मजबूत आहे. तसेच आम्ही तळागाळापर्यंत चांगली बांधणी केली आहे. दानवे यांनी केंद्रातील मोदी सरकारला चार वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त पत्रकार परिषद घेतली. दरम्यान ते पत्रकासंसोबर बोलत होते.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील ?

गेल्या 4 वर्षात भाजप-शिवसेना यांनी एकही निवडणूक एकत्र लढलेली नाहीये. त्याचा फटका दोन्ही पक्षाला बसतो आहे. शिवसेना आणि भाजप युती न झाल्यास कॉंग्रेस पुन्हा एकदा सत्तेत येईल,