ट्रोलिंगनंतरही रिकी पॉण्टिंगचा आखडूपणा काही कमी होईना, म्हणाला…

riki

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि विद्यमान समालोचक रिकी पाँटिंगला भरातीय चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. अनेक नेटकऱ्यांनी पाँटिंगच्या वक्तव्यानंतर त्याला ट्रोल करत टीकास्त्र सोडलं होतं. यामध्ये भारताचे माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग आणि वासिम जाफर यांचाही समावेश होता. सिडनी टेस्टमध्ये आपली कॉमेंट्री आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे ट्रोल होणारा रिकी पॉण्टिंगचा आखडूपणा काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये.

ब्रिस्बेनच्या चौथ्या टेस्टमध्येही ऑस्ट्रेलिायाचं वर्चस्व असेल, असं पॉण्टिंग म्हणाला आहे. टीम इंडियाच्या फिटनेसच्या अडचणींचा ऑस्ट्रेलियाला फायदा होईल, तसंच ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाची कामगिरी जबरदस्त आहे, अशी प्रतिक्रिया पॉण्टिंगने दिली. हनुमा विहारी आणि अश्विन यांच्या मॅरेथॉन खेळीमुळे भारताला तिसरी टेस्ट ड्रॉ करता आली. आता 15 जानेवारीपासून चौथ्या टेस्टला सुरूवात होईल.

ब्रिस्बेन टेस्टमध्ये हनुमा विहारी आणि रविंद्र जडेजा खेळणार नाहीत. सिडनीमध्ये झालेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये दोघांनाही दुखापत झाली होती. क्रिकेट.कॉम.एयूशी बोलताना रिकी पॉण्टिंग म्हणाला, ‘ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाचा पगडा भारी असेल, कारण त्या मैदानातलं त्यांचं रेकॉर्ड शानदार आहे. विल पुकोवस्की फिट झाला, तर टीममध्य कोणताही बदल होणार नाही. सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाने चांगली कामगिरी केली. भारताचे काही खेळाडू दुखापतग्रस्त आहेत, त्यामुळे त्यांना बदल करावे लागतील.’ ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेनच्या गाबा मैदानात 33 मॅच जिंकल्या, यातल्या 13 मॅच ड्रॉ झाला, तर आठ मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. भारताला या मैदानात कधीही मॅच जिंकता आलेली नाही. दरम्यान १५ जानेवारीपासून चौथ्या टेस्टला सुरूवात होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP