‘मित्रा ही तर फक्त सुरुवात’, श्रेयस अय्यरच्या कसोटी पदार्पणावर रिकी पाँटिंगची प्रतिक्रिया 

‘मित्रा ही तर फक्त सुरुवात’, श्रेयस अय्यरच्या कसोटी पदार्पणावर रिकी पाँटिंगची प्रतिक्रिया 

shreyash iyar

कानपूर : मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये आपले स्थान पक्के करणाऱ्या श्रेयस अय्यर (shreyash iyar) ने न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर कसोटीने आपला प्रवास सुरू केला आहे. इंडियन प्रीमियर लीग (ipl) फ्रँचायझी टीम दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असलेला श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) यांच्यात खूप चांगले संबंध आहेत.

अय्यरच्या कसोटी पदार्पणाने रिकी पाँटिंग खूप खूश झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा हा माजी कर्णधार श्रेयस अय्यरच्या पदार्पणानंतर म्हणाला की, ‘ही फक्त सुरुवात आहे. विराट कोहली दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळत नाही आणि अशा परिस्थितीत अय्यर या सामन्यात खूप महत्वाचा असणार आहे.

दरम्यान, मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांनी श्रेयस अय्यरच्या पदार्पणाच्या कसोटी कॅपचा व्हिडिओ शेअर करत ट्विटरवर लिहिले की, ‘तुम्ही गेल्या काही वर्षांमध्ये घेतलेल्या मेहनतीमुळे तुम्ही त्यास पात्र आहात. ही तर सुरुवात आहे मित्रा. मला तुझा अभिमान आहे.’ असे म्हणत त्यांनी श्रेयस अय्यरचे कौतुक केले आहे.

अय्यरला भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी पदार्पणाची कसोटी कॅप घातली होती. या मालिकेपूर्वी केएल राहुलला दुखापत झाली, त्यानंतर सूर्यकुमार यादवला त्याचा बॅकअप म्हणून संघात स्थान मिळाले. प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी सूर्यकुमार आणि अय्यर यांच्यात चुरशीची लढत झाली.

सामन्याच्या एक दिवस आधी या सामन्यात संघाचे नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेने अय्यर कसोटी पदार्पण करणार असल्याचे स्पष्ट केले होते. अय्यरसाठी हे वर्ष चढ-उतारांनी भरलेले आहे. या वर्षी मार्चमध्ये इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान त्याच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली.

2020 IPL मध्ये दिल्ली कॅपिटल्सला आपल्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत नेणारा अय्यर IPL 2021 चा पहिला टप्पा खेळू शकला नाही, त्यामुळे ऋषभ पंतकडे संघाची कमान सोपवण्यात आली. आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात त्याने पुनरागमन केले, परंतु हंगामाच्या मध्यभागी संघ व्यवस्थापनाने कर्णधारपद पंतकडे ठेवण्याचा निर्णय घेतला.

महत्वाच्या बातम्या: