शेन वॉर्नच्या आठवणीत रिकी पॉंटिंग ढसाढसा रडला…

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने फिरकीपटू शेन वॉर्नच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्याने वॉर्नला ज्यांच्यासोबत आणि विरुद्ध खेळणारा बेस्ट बॉलर असल्याचेही सांगितले. ५२ वर्षीय शेन वॉर्नचा शुक्रवारी संशयास्पद हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. वॉर्नच्या जाण्याने संपूर्ण क्रिकेट जगत हळहळत असताना रिकी पॉंटिंग सुद्धा आपले अश्रू थांबवू शकला आहे.

“हे शब्दात सांगणे कठीण आहे. मी त्याला पहिल्यांदा भेटलो जेव्हा मी १५ वर्षांचा होतो. त्याने (shane warne) मला माझे टोपणनाव दिले. आम्ही एका दशकाहून अधिक काळ टीम मेट होतो,आणि खेळतील प्रत्येक टप्प्यात एकत्र चालत होतो. त्याचे कुटुंबावर खूप प्रेम होते आणि तो सर्वांसाठीच नेहमी हजर असायचा,” असे ट्विट पाँटिंगने (ricky ponting) केले.

https://youtu.be/Q96XCvpic8E

दुसर्‍या व्हिडिओमध्ये पॉंटिंगने अश्रू ढाळत वॉर्नला श्रद्धांजली वाहिली आणि सांगितले की ही बातमी पचायला थोडा वेळ लागेल. “हे सर्व पचवण्यासाठी आणि तो माझ्या आयुष्याचा किती मोठा भाग होता याचा विचार करण्यासाठी माझ्याकडे आता काही तास आहेत.,” पाँटिंग म्हणाला. यावेळी पॉंटिंग वॉर्नच्या आठवणीत भावनिक होत ढसाढसा रडताना दिसला.

महत्वाच्या बातम्या