पुण्यात रिक्षाची भिंतीला जोरदार धडक

अपघातात तेरा वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

पुण्यातील कोंढवा खुर्द येथील वेताळ बाबा चौकात रिक्षा भिंतीला धडकल्याने झालेल्या अपघातात एका चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. हा अपघात दुपारी बाराच्या सुमारास घडला

कोंढवा खुर्द येथील वेताळ चौकामधून जाणाऱ्या रिक्षा चालकाचा रिक्षावरील ताबा सुटला. त्यामुळे रिक्षाची समोर असणाऱ्या भिंतीला जोरदार धडक झाली. या अपघातात सानिया तौफिक अत्तार या तेरा वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर रिक्षाचालकसह चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखीमवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.