न्यूझीलंड क्रिकेट मंडळ संचालकपदाचा रिचर्ड हॅडली चा राजीनामा

Richard Hadlee resigns as New Zealand Cricket Board's governing body

वेलिंग्टन : न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचे संचालक सर रिचर्ड हॅडली यांनी आपल्या पदाचा राजीनामा मंडळाकडे सुपूर्द केला. त्यांचा चार वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी पदभार सोडला. मंडळाच्या नियमानुसार दोन संचालकांपैकी एका संचालकाने कार्यकाळ संपल्यावर आपला पदभार सोडणे अनिवार्य आहे. त्यामुळे सर हॅडली यांनी पुन्हा निवडणूक न लढवता पदत्याग केला.

Richard Hadlee steps down as New Zealand Cricket board director

या काळात हॅडली यांनी न्यूझीलंडच्या देशांतर्गत क्रिकेटला सुगीचे दिवस आणण्यास महत्वाची भूमिका पार पाडली. मंडळात काम करताना मंडळाच्या कामकाजाची पद्धत आणि सहका-यांची कामसू वृत्ती पाहून मला आनंद झाला.Richard Hadlee steps down as New Zealand Cricket board director

देशांतर्गत क्रिकेटच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हा खेळ पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला. तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूझीलंडचे नाव मोठे करण्यासही मी माझे प्रयत्न केले. मंडळाने मला या कालावधीत केलेल्या सहकार्यासाठी मी त्यांचा आभारी आहे, अशी प्रतिक्रिया हॅडली यांनी व्यक्त केली.Richard Hadlee steps down as New Zealand Cricket board director