मुंडेंविरोधातील अविश्वास ठराव मागे घ्या ; मुख्यमंत्र्यांचे आदेश

Tukaram-Mundhe (1)

टीम महाराष्ट्र देशा : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात सत्ताधारी भारतीय जनता पक्षासह विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव अखेर मागे घेण्याचे निश्तिच झाले आहे. सामाजिक संघटना आणि सोशल मीडियाकरांनी मुंढे यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मुंढेंच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचे निर्देश दिले. १ सप्टेंबरला होणार्या महासभेत अविश्वास प्रस्ताव मागे घेण्यात येईल, असे नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांनी जाहीर केले.

Loading...

दरम्यान, तुकाराम मुंढे यांची नाशिकमधील कारकीर्दही वादग्रस्त ठरली आहे. त्यांच्या घरपट्टी करात वाढीच्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजपसह विरोधी नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळेच मुंढे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला. १ सप्टेंबर रोजी त्यासाठी महासभा होणार होती. परंतु, नाशिकमधील जनता आणि सोशल मीडियावरून मुंढे यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनीही मुंढे यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेत सत्ताधारी भाजपला अविश्वास मागे घेण्याचे आदेश दिले.

3 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...