प्रेक्षकांना आगोदरच कळलेला ‘तुला कळणार नाही’

वेब टीम;सक्षम फिल्म्स आणि जीसिम्स प्रस्तूत तसेच सिनेकोर्न इंडियाचे सौजन्य लाभलेला ‘तुला कळणार नाही’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे.पती पत्नी मधील नात्यांमध्ये निर्माण होणारा दुरावा आणि शेवटी होणारा हॅप्पी एन्ड या सर्वश्रुत असलेल्या साच्यामधील हा सिनेमा येत्या ८ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित या सिनेमात राहुल- अंजली या रोमेंटिक कपलची लग्नानंतरची कहाणी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णीची या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. सिनेमाचा पोस्टर पहिला तर, ‘तुझे माझे जमेना, तुझ्यावाचून करमेना’ अशी नवरा-बायकोमधील केमिस्ट्रीची कॉपी आहे की काय अशी शंका येऊ शकते. या सिनेमामध्ये नक्की काय असेल याची कल्पना या सिनेमाचा ट्रेलरवरून येऊ शकते.

संगीत ही या सिनेमाची जमेची बाजू असून शीर्षकगीत छान आहे .रोमेंटिक बाज असलेल्या या शीर्षकगीताचे बोल क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले असून, संगीतदिग्दर्शक अमितराज यांनी त्याला चाल दिली आहे. स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपालने गायले आहे.

श्रेया कदम आणि स्वप्नील जोशी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या सिनेमाच्या ट्रेलर वरून सुबोध- सोनालीची केमिस्ट्री अगदी चांगली जुळून आल्याचे दिसत आहे .मात्र सुबोधच्या या आधीच्या पुरस्कार विजेत्या भूमिका पाहिलेल्या प्रेक्षकांना हा सिनेमा आवडेल की नाही हे आताच सांगणं अवघडआहे. नवरा-बायकोच्या नात्यातील रुसवा-फुगवा, अनामिक ओढ आणि एकमेकांवरचे अबोल प्रेम या सारखी जुनीच कल्पना घेऊन बनव