कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; राहुल जगताप आक्रमक

rahul jagtap

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- जगभरात लॉकडाऊन असताना शेतकऱ्यांनी कष्टाने शेतामधी कांद्याचे उत्पादन घेतले. कांद्यालाही आता कुठे चांगला भाव येऊ लागल्याचे दिसत होते. चार पैसे हातात पडतील अशी आशा शेतकऱ्यांना होती, पण केंद्रातील मोदी सरकारने अचानक निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे. केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप यांनी दिला आहे.

कांदा निर्यात बंदीचा निर्णय त्वरित मागे घेऊन केंद्र सरकारने आपली चूक सुधरावी. कांद्याच्या दरात होत असलेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारविषयी नाराजी तयार झाली आहे. श्रीगोंदा तालुका हा रब्बी हंगामातील कांदा लागवड व उत्पादनासाठी राज्यातील अग्रगण्य तालुक्यांपैकी एक आहे. केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीचा घेतलेला निर्णय जुलमी व शेतकरी विरोधी आहे. तरी केंद्र शासनाने लवकरात लवकर कांदा निर्यात बंदीचा घेतलेला निर्णय तत्काळ रद्द करावा अन्यथा या निर्णया विरोधात तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही माजी आमदार राहुल जगताप यांनी दिला.

श्रीगोंदा तालुक्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने याबाबत निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी माजी आमदार राहुल जगताप, ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस, नगरसेवक मनोहर पोटे, हरिदास शिर्के, दीपक भोसले, स्मितल वाबळे, राजाभाऊ लोखंडे यांच्यासह दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :-