राज्याचे उत्पन्न घटले असले तरी, कोणताही कर वाढवणार नाही – बाळासाहेब थोरात

balasaheb

अहमदनगर : कोरोनाला रोखण्याबरोबरच राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्या दृष्टीने कुठे खर्च कमी करायचा, उत्पन्न कुठून वाढवायचे, याबाबत मंत्रिमंडळात चर्चा सुरू आहे. राज्याचे उत्पन्न घटले असले तरी, कोणताही कर वाढवण्याचा सध्या विचार नसल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. नगर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल दिवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह उपस्थित होते.

महसूलमंत्री थोरात म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने चांगल्या उपाययोजना केल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखता आला. प्रशासकीय पातळीवरही सर्वांनी चांगले काम केले आहे. लॉक डाऊन उठल्यानंतर हळूहळू व्यवहार सुरळीत होत आहेत. मात्र, लॉक डाऊनमुळे राज्याच्या उत्पन्न वाढीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे खर्चात कपात करण्यासह अन्य काही करता येईल का, याबाबत चर्चा सुरू आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेचा ‘बॅण्ड’ वाजला, सामनातून भाजपला घेतले फैलावर

राज्य सरकारला आणखी निधी देण्याची मागणी आम्ही केंद्र सरकारकडे करणार आहोत. केंद्राकडून अनेक योजनांचा राज्याचा हिस्सा येणे बाकी आहे. त्यात पाच हजार चारशे कोटींचा जीएसटीचा परतावा मिळणे गरजेचे आहे. वारंवार मागणी करूनही तो हिस्सा मिळालेला नाही. सध्या लॉक डाऊन असल्यामुळे राज्यांप्रमाणेच केंद्र सरकारवरही आर्थिक ताण असल्याचेही ते म्हणाले.

संतापजनक : शिवराज्याभिषेक दिनासंबंधी भाजप नेत्याचे आक्षेपार्ह ट्वीट, आपची पोलिसांत तक्रार