महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

टीम महाराष्ट्र देशा : निळवंडे धरणाचे काम येत्या जूनअखेर पूर्ण करून धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा उपलब्ध होईल यासाठी ‘निळवंडे’ प्रकल्पाच्या कामाला अधिक गती देऊन, कालबद्ध पद्धतीने काम पूर्ण करण्याचे आदेश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.

मंत्रालयात ऊर्ध्व प्रवरा प्रकल्प (निळवंडे-2) संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रकल्पाचा पूर्ण आढावा घेऊन प्रकल्पाच्या कामात काय अडचणी आहेत, त्या जाणून घेतल्या आणि प्रकल्पाला गती देण्याचे आदेश थोरात यांनी दिले.

Loading...

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि पाणीप्रश्न सोडविण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. या प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रकल्पासाठी निधीची कमतरता नाही पण कामाला पाहिजे त्या प्रमाणात गती दिसत नाही यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करून त्याचे नियोजन करावे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून प्रकल्प पूर्ण करावा अशा सूचनाही थोरात यांनी दिल्या.

या प्रकल्पाच्या कामाचा पुन्हा आढावा घेण्यासाठी लवकरच प्रकल्पाची पाहणी करण्यात येईल, असे आश्वासनही श्री. थोरात यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले. यावेळी संबंधित अधिकारी, शेतकरी ज्ञानेश्वर वर्षे, गंगाधर गमे, नानासाहेब शेळके, उत्तमराव घोरपडे, रवींद्र गागरे, संजय येलमे, दादासाहेब पवार उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार