बोटीद्वारे गोदावरी पात्रात उतरुन महसुल विभागाची वाळु माफियाविरुद्ध धडक कारवाई

नांदेड : गोदावरी नदीतून अवैध वाळू उपसा थांबावा म्हणून जिल्हा प्रशासन हे सुटीच्या दिवशी रविवारी ही सक्रिय होते. रविवारी सकाळी महसुल विभागाने ब्राम्हणवाडा, त्रिकूट, बोंढार, नागापूर या ठिकाणी कारवाई करत तराफे नष्ट केले. वाळु माफियाविरुद्ध ही कारवाई अशीच सुरु राहील असे यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

सुटीच्या दिवशी रविवारी सकाळीच नांदेड तहसीलचे पथक गोदावरी पात्रात उतरले. या पथकाने ब्राम्हणवाडा, त्रिकूट, बोंढार, नागापूर या भागांत पाहणी केली, तर या ठिकाणी वाळू उपसा करणारे ४८ तराफे नष्ट केले. यावेळी २२ मोठे तराफे कटरद्वारे नदीतच नष्ट केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, नांदेडचे तहसीलदार किरण अंबेकर यांच्यासह मुदखेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक महेश शर्मा यावेळी उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यात वाळुघाट लिलावाची सध्य तिसरी फेरी आहे. याआधी पार पडलेल्या ई-लिलाव प्रक्रियेत एकूण ३२ पैकी केवळ दोन घाटांची बोली लागली गेली होती, तर इतर घाटांना प्रतिसाद मिळाला नाही. पण याचवेळी अवैध वाळु उपसा मात्र जोमात सुरु होता. कारवाई केलेल्या अनेक ठिकाणी परप्रांतीयावर गुन्हे दाखल केले होते. पण यामुळे काहीच फरक जाणवला नाही. विशेष म्हणजे ज्या अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात अवैध वाळु उपसा होत आहे. त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल असा इशारा वर्षभरापुर्वी जिल्हधिकारी यांनी दिला होता.

महत्वाच्या बातम्या